Dailyhunt

नांदेड - कासरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भक्तीचा गजर

नांदेड, 09 एप्रिल (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील मौजे कासरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरू झाला असून रोज हरिपाठ, ज्ञानेश्वर पारायण, किर्तन, भजन, काकड आरती, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून सांगता दि.

९ एप्रिल रोज गुरुवारी होणार असल्याचे गावकऱ्यांच्या वतीने ह.भ.प. नागनाथ महाराज कासरवाडीकर यांनी सांगितले आहे. परम पुज्य श्री सद्गुरू नराशाम महाराज यांच्या कृपा अशिर्वादाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह सपंन्न होणार असून रोज रात्री विविध प्रसिद्ध महाराज मंडळीचे किर्तन पार पडत आहेत. तरी या किर्तन सोहळ्याचा सर्व भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे कासारवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

अखंड हरीनाम सप्ताह निमित्त दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत. पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, स. १० ते १२ संत तुकाराम गाथा भजन, सांयकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व नंतर हरिजागर पार पडलं

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi