Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

नांदेड- मोसंबी, पेरू व हळद या पिकासाठी 14 जुलैपर्यंत विमा भरण्याचे आवाहन

Hindusthan Samachar 3 months ago

नांदेड, 08 जुलै (हिं.स.)अर्धापूर तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत खरीप 2026- मृग बहारसाठी मोसंबी, पेरू ,या फळ पिकासह यंदा प्रथमच हळद या पिकाचा ही समावेश करण्यात आला आहे.

मृग बहार अंतर्गत मोसंबी पेरू व हळद या पिकासाठी 14 जुलै पर्यंत विमा अर्ज सादर करता येणार आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन अर्धापूर तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांनी केले आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टक योजनेअंतर्गत फार्मर आयडी शेतकरी ओळख पत्र अनिवार्य आहे. अर्धापूर तालुक्यात यंदा पुनर्रचित हवामानावर आधारित फळविमा योजना भारतीय कृषीविमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत केवळ उत्पादनक्षम फळ पिकानाच विमा संरक्षण लागू राहणार आहे. अधिसूचित फळपिकापैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहार या दोन्हीपैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण घेता येणार. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँका व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर करू शकतात.

समाविष्ट महसूल मंडळे व अधिसूचित फळपिके

अर्धापूर : हळद

मालेगाव : हळद , मोसंबी, पेरू .

दाभड : हळद ,पेरू

मृग बहार २०२६ फळपिक रक्कम हेक्टरी ( रुपयात )

शेतकऱ्यांनी भरावयाचे हप्ता व विमा संरक्षित रक्कम

हळद फळपीकासाठी 9 हजार रु. विमा हप्ता असून, विमा संरक्षित रक्कम१ लाख ८० हजार रुपये आहे. मोसंबी फळपीकासाठी 5 हजार रुपये हप्ता असून विमा संरक्षित रक्कम 1 लाख आहे. पेरूसाठी ३ हजार ५०० हप्ता असून ७० हजार रूपये विमा संरक्षण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi