Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नांदेडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कारकिर्दीचा गौरव

नांदेडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कारकिर्दीचा गौरव

नांदेड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड शहर आणि जिल्ह्यात डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा गौरव करण्यात आला. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढ्याला बळ देतानाच समाजात स्वाभिमान आणि परिवर्तनाची चेतना जागवणारे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी शिलेदार, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

अण्णाभाऊंच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांचा गौरव करण्यात आला. नांदेड शहर आणि परिसरातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi