नांदेड, 30 मे (हिं.स.)।
नांदेड शहर व जिल्ह्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' अंतर्गत मोठी आणि निर्णायक कारवाई करत तब्बल २४ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.
भाग्यनगर व विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली असून, पोलीस विभागाच्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनॉल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात दोन गुन्हेगार गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून तणाव निर्माण झाला होता. या वादातून तीन खुनाच्या गंभीर घटना घडल्या होत्या. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आरोपींनी आपापसातील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. सदर आरोपी हे संघटित टोळीच्या स्वरूपात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वरिष्ठांनी केले मार्गदर्शन
अनेक आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, जामिनावर सुटल्यानंतरही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. त्यांच्या वाढत्या दहशतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला यांनी मोक्का लागू करण्यास मंजुरी दिली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
