Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

नाशिक - बनावट ई-चलनाचा मेसेज पाठवून ९० हजारांची फसवणूक

नाशिक, 06 मे, (हिं.स.) : बनावट ई-चलनाचा मेसेज पाठवून त्यावरील लिंक क्लिक केल्यानंतर अज्ञात इसमाने ९० हजार रुपये परस्पर काढून घेत एका इसमाची फसवणूक केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रीतेश कांतीलाल भंडारी (रा.

लंबोदर अपार्टमेंट, हिरावाडी, पंचवटी) यांना १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने बनावट ई-चलनाचा मेसेस पाठविला. त्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून अॅक्सिस बँकेच्या खात्यावर ९० हजार रुपये परस्पर वर्ग झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर भंडारी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसम व बँक खातेधारकाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi