Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

नाशिक - भाजपाच्या वतीने रविवारी सहकार मेळाव्याचे आयोजन

नाशिक, 04 जुलै (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त भाजपा नाशिक महानगर जिल्हा सहकार आघाडीच्या वतीने उद्या (दि.५) दुपारी ४ वाजता भाजपा नाशिक वसंतस्मृती कार्यालय, एन.डी.पटेल रोड येथे सहकार संवाद व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात सहकारातील विविध मान्यवर मार्गदर्शन करणार असून त्यात सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी पतसंस्था, ग्राहक संस्था, कर्मचारी पतसंस्था, महिला बचत गट संस्था, सहकारी दुग्ध व साखर कारखाने आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे सहकार आघाडी संयोजक अॅड. महेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झाले.

सहकारात काम केलेले अमित शहा हे केंद्रातले पहिले सहकार मंत्री झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकारात अमुलाग्र बदल झाले. सहकारातले बदललेले कालबाह्य कायदे, सहकाराला केंद्राने केलेली मदत आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या सहकार मेळाव्यास सहकार क्षेत्रातील सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन सहकार आघाडीचे संयोजक अॅड. महेंद्र सूर्यवंशी, सहसंयोजक, शोभा सोनवणे, अॅड. शलाका पाटील, राहुल पवार, जयेश शेवाळे यांनी केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi