नाशिक, 30 जुलै (हिं.स.)।
शहरातील एक्स्लो पॉईंट या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या कोतकर यांच्या परिवाराने महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेरच आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे आता शहरातील नागरिक किती त्रस्त झाले आहेत यावरून हे समोर येत आहे.
नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने विविध विकासकार्य सुरू आहेत या विविध विकास कार्याच्या नावाखाली शहरांमध्ये अनेक चांगल्या रस्त्यांना खड्ड्यांनी ग्रासले आहे विविध भागांमध्ये खड्डे पडलेले आहेत पण त्याकडे महापालिका सिंहस्थ कुंभमेळ्याची विकास कार्य सुरू असल्याचे सांगून दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नाशिक शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ती त्रस्त झाली असून नागरिकांनी तक्रारी करूनही ढिम्मच असलेल्या महापालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे तर लोकप्रतिनिधी देखील नागरिकांच्या तक्रारीकडे खूप गांभीर्याने बघत नसल्याचे काही घटनांमधून समोर आलेले आहे त्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत.
शहरामध्ये या खड्ड्यांमुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेले असून पाचवा बळी हा बुधवारी सायंकाळी गेला आहे शहरातील अंबड एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या एक्स्ट्रा पॉईंट या ठिकाणी खड्डा चुकविण्याच्या नादामध्ये निलेश कोतकर या चाळीस वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला त्यामुळे कोतकर परिवारा वरती दुःखाची छाया पसरली आहे या कोतकर परिवारातील सदस्य असलेल्या ज्योती कोटकर तसेच त्यांची पाच वर्षाची मुलगी सासू आणि भावजय या परिवारातील सदस्यांनी गुरुवारी सकाळी तडक नाशिक महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय गाठले आणि कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले ज्यापूर्वी या परिवाराने महापालिका आयुक्त यांची भेट मागितली होती परंतु ती भेट मिळू न शकल्यामुळे या परिवाराने हे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे शहरातील नागरिकांना किती मोठ्या प्रमाणावर ती त्रास होतो हे समोर आले आहे.
मनपा आयुक्त यांचे आश्वासने आंदोलन मागे
आंदोलन करणाऱ्या कोतकर परिवाराची महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी फोनवरती चर्चा केली असून या चर्चेच्या वेळी परिवारातील एका सदस्याला महापालिकेमध्ये नोकरी देण्याचे आणि मुलीच्या भविष्य बाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्यानंतर कोतकर परिवाराने सुरू असलेले आंदोलन हे मागे घेतले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

