Monday, 18 Jan, 9.30 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
नाशिक : लासलगाव ग्रामपालिकेवर ग्रामविकासचा झेंडा

नाशिक,१८ जानेवारी (हिं.स) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश मिळवत परिवर्तन पॅनलला घरचा रस्ता दाखविला.या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जयदत्त होळकर,नानासाहेब पाटील यांच्या ग्रामविकास पॅनल दहा तर कल्याणराव पाटील, डि के जगताप, प्रकाश दायमा यांच्या परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार निवडून आले. येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये संतोष पलोड व संदीप उगले यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात आली यात संतोष पलोड यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी करण्यात आली. वार्ड क्रमांक १ मधून चंद्रशेखर होळकर यांना ५६०, अश्विनी बर्डे ५२६ , अमिता ब्रम्हेचा ५३० , वार्ड नंबर २ मधून रोहित पाटील ११६७ , अमोल थोरे १०५२ , सायली पाटील १०४८ , वार्ड नंबर ३ मधून नानासाहेब पाटील यांना ११६१ , सुवर्णा जगताप १२६२ , वार्ड नंबर ४ मधून अफजल शेख ८२४ , पुष्पा आहिरे ६९९ , रेवती होळकर ७४५ वार्ड नंबर ५ संतोष पलोड ४९९ , संगीता पाटील ६८८ , योगिता पाटील ६४३ , वार्ड नंबर ६ , जयदत्त होळकर ८९६ , रामनाथ शेजवळ ८०७ , ज्योती निकम ७३९ मतांनी निवडून आले आहे.

हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top