Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

नाशिक : नवीन बिझनेसच्या नावाने अडीच लाखांची फसवणूक

नाशिक, 22 सप्टेंबर (हिं.स.)। नवीन बिझनेस चालू करीत असून, त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना अंबड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांना १४ जुलै २०२६ रोजी आरोपी संत विजय सिंग, आर्यन सिंग व अंशू सिंग यांनी फिर्यादीची भेट घेऊन मी नवीन बिझनेस चालू करीत आहे. तुम्ही मला पैसे द्या. मी तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून २ लाख ४० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले, तसेच दि. ८ ऑगस्ट रोजी फिर्यादीला व्यवसाय दाखविण्यासाठी इंदूर येथे नेले. तेथे फिर्यादीचा १८.६१० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस फिर्यादीकडून घेऊन तो राजेशकुमार प्रजापती याच्या मदतीने मुथुट फायनान्स बँकेत गहाण ठेवून त्याचा अपहार केला, तसेच आरोपी अंशू सिंग, आर्यन सिंग यांनी फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi