
दिवसभर वाट बघून केला निषेध
नाशिक, 30 जुलै, (हिं.स.)। शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांचा शिष्टमंडळाने दिवसभर वाट बघूनही महापौरांनी भेटण्यास टाळाटाळ केल्यामुळे शिवसेनेच्या वतीने निषेध करून नगरसेवक रिकाम्या त्याने परत फिरले दरम्यान या सर्व प्रश्नांवरती महासभेमध्ये जाब विचारू असा इशारा गटनेते केशव पोरजे यांनी दिला आहे.
नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांच्या होत असलेल्या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत चार जणांचा बळी गेलेला आहे या बळी आणि शहरातील रोडची झालेली दयनीय अवस्था नाशिककरांची होत असलेली गोंधळाची परिस्थिती या सर्व प्रश्नावरती विशेष महासभा बोलवण्याची मागणी सतत त्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने केली जात आहे या प्रश्नावर ती आज गुरुवारी 30 जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्यात आले यावेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर या सर्व नगरसेवकांनी आपला मोर्चा महापौर हिमगौरी आहेर यांच्या दालना कडे वळवला त्या ठिकाणी गेल्यानंतर पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांनी महापौर आहेर यांना फोन करून शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर महापौरांनी कार्यालयात येणार आहे असे सांगून वेळ मारून नेले.
दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेना नगरसेवकांचे आणि पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ महापौरांच्या दालनात बसलेले होते परंतु महापौर कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यानंतर पुन्हा तीन वाजता शिवसेनेचे शिष्ट मंडळ हे महापौरांच्या जालनात गेले त्यावेळी त्यांनी महापौरांना फोन करून आल्याचे सांगितले परंतु महापौर आलेच नाही साडेपाच वाजेपर्यंत या नगरसेवकांचा शिष्टमंडळाने महापौरांची चर्चेसाठी वाट बघितली परंतु महापौर कार्यालयाकडेच फिरकल्या नाही त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी या घटनेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
महासभेत जाब विचारू
या सर्व प्रश्नावरती बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरपालिकेतील गटनेते केशव पोरजे यांनी सांगितले की महापौरांनी प्रतिनिधी मंडळाची चर्चा करायला पाहिजे होती नगरसेवकांचे प्रश्न समजून घेतल्या असते तर त्यांना शहराची काय परिस्थिती आहे ही कळली असती परंतु महापौर हे दडप शाहीने काम करत आहे. या कृतीचा निषेध करत असून येणाऱ्या महासभेमध्ये यावरती जाब विचारला जाईल असेही त्यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

