Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळमध्ये पुराचा कहर; मृतांचा आकडा ७८८ वर, २,५०२ जण अद्याप बेपत्ता

नेपाळमध्ये पुराचा कहर; मृतांचा आकडा ७८८ वर, २,५०२ जण अद्याप बेपत्ता

काठमांडू, 30 ऑगस्ट (हिं.स.)।नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ७८८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक २६४ मृत्यू चितवनमध्ये झाले आहेत.

त्यानंतर नवलपरासी पूर्वमध्ये १९४, नवलपरासी पश्चिममध्ये १२०, गोरखामध्ये ५८, नुवाकोटमध्ये ५२, धादिंगमध्ये ५०, तनहूमध्ये ३७ आणि रसुवामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी (एनडीआरआरएमए ) ने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजेपर्यंत २,५०२ जण बेपत्ता होते. अनेक पूरग्रस्त भागांमध्ये बचावकार्य अद्याप सुरू आहे. ओळख पटू न शकलेल्या मृतदेहांना देशभरातील २१ रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहे.

एनडीआरआरएमए नुसार, बेपत्ता व्यक्तींमध्ये प्रादेशिक जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे ९३३ कर्मचारी, ५९२ परदेशी नागरिक आणि परदेशी पर्यटकांसोबत प्रवास करणारे १२७ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता व्यक्तींच्या यादीत नेपाळ पोलीस, नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल, सीमा शुल्क कार्यालय आणि स्थलांतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २३९ जखमींवर उपचार सुरू असून आपत्तीग्रस्त भागात सहा शस्त्रक्रिया वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. सुमारे २० हजार सुरक्षा जवान बचावकार्यात सहभागी झाले असून, त्यांच्या मदतीने जमिनीवरील पथकांनी आतापर्यंत ८,७३० जणांची सुटका केली आहे.

हवाई बचाव पथकांनी हेलिकॉप्टरच्या ३६३ फेऱ्या केल्या. या माध्यमातून ३,०८१ जणांना, त्यामध्ये २३६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच, अलीकडच्या दिवसांत पुराच्या पाण्यात अडकलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून थेट २७९ जणांची सुटका करण्यात आली आहे.

एनडीआरआरएमएने पुढे सांगितले की, नेपाळ सरकारने आपत्कालीन आर्थिक मदतही जाहीर केली आहे. यामध्ये रसुवा आणि नुवाकोटला प्रत्येकी १ कोटी नेपाळी रुपये, धादिंगला ५० लाख नेपाळी रुपये आणि १५ स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण ६ कोटी ७५ लाख नेपाळी रुपये देण्यात आले आहेत.

मदतकार्यांतर्गत उत्तरगया आणि धुंचे यांसारख्या संपर्क तुटलेल्या भागांमध्ये अन्नधान्य, संपर्क यंत्रणा आणि आपत्कालीन साहित्य पोहोचवण्यासाठी ५० वाहतूक वाहने आणि आठ हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. सतत सुरू असलेल्या हवाई आणि जमिनीवरील बचावकार्यांसाठी इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे. काठमांडूहून पूरग्रस्त भागांमध्ये मदतसामग्री पाठवली जात आहे.

दरम्यान, पुरात बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्रिभुवन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनमधील शवागारात पोहोचत आहेत. येथे विविध भागांतून मृतदेह आणले जात आहेत. त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांमध्येही चिंता आणि अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi