Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नोकरीवरून काढल्याचा राग, डॉक्टरचा सायनमध्ये टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

नोकरीवरून काढल्याचा राग, डॉक्टरचा सायनमध्ये टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

* थोडक्यात बचावला

मुंबई, २७ ऑगस्ट (हिं.स.) : नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून एका डॉक्टरने सायन रेल्वे स्थानकातील टॉवरवर चढून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिताफीने बचाव मोहीम राबवून या व्यक्तीला खाली उतरवले आणि सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला.

उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर असलेल्या व्यक्तीने रेल्वे स्थानकातील गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी पावणे आठ ते आठ वाजण्याच्या सुमारास सायन रेल्वे स्थानकातील एका हाय व्होल्टेज टॉवरवर एक व्यक्ती चढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टॉवरवर चढलेल्या व्यक्तीची समजूत काढून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले. मात्र, पोलिसांचे ऐकण्याऐवजी त्या व्यक्तीने टॉवरवरच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही दृश्ये पाहून स्थानकातील प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

व्यक्तीने गळफास घेताच टॉवरखाली तैनात असलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत कौशल्याने टॉवरवर चढून त्या व्यक्तीला खाली उतरवले. तोपर्यंत त्या व्यक्तीचा श्वास थांबल्यासारखा झाला होता. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ त्याला 'सीपीआर' दिला आणि त्याचा जीव वाचला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi