Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ओहळात दुचाकी कोसळून तरुणीचा मृत्यू

ओहळात दुचाकी कोसळून तरुणीचा मृत्यू

रायगड, 02 जुलै (हिं.स.)। : अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. २ जुलै) झालेल्या भीषण दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर गणेश पवार (वय २२, रा. पाटण सही आदिवासीवाडी, ता. रोहा) हा त्याची मैत्रीण वृषाली अंकुश वाघमारे (वय १८, रा. तासगाव आदिवासीवाडी, ता. मुरुड) हिला एमएच-०६-सीआर-०२९५ क्रमांकाच्या यामाहा दुचाकीवरून अलिबाग-रोहा मार्गाने घेऊन जात होता.

सुडकोली गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या ओहळात कोसळले. अपघातात ईश्वर पवार याचा डावा पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला, तर मागे बसलेल्या वृषाली वाघमारे हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पावसामुळे ओहळातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुचाकी बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित शिवाजीराव गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi