मुंबई, 03 जुलै (हिं.स.)। चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने आपली रेनो 16 सिरिज भारतात अधिकृतपणे लाँच केली असून रेनो 16 आणि रेनो 16सी या दोन नव्या स्मार्टफोननी मिड-रेंज बाजारात मोठी चर्चा निर्माण केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी चीनमध्ये पदार्पण झाल्यानंतर आता ही मालिका भारतातही दाखल झाली असून प्रीमियम डिझाइन, मजबूत कॅमेरा आणि मोठी बॅटरी यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. दोन्ही फोन स्टार्री व्हाइट, स्टेलर पर्पल आणि ट्वायलाइट व्हायोलेट या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
भारतात ओप्पो रेनो 16 ची सुरुवातीची किंमत 61,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मिळते. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट 67,999 रुपयांना उपलब्ध आहे. दुसरीकडे रेनो 16सी हा अधिक परवडणारा पर्याय असून त्याची सुरुवातीची किंमत 46,999 रुपये आहे. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते, तर 8 जीबी आणि 256 जीबी व्हेरिएंट 49,999 रुपयांना आणि 12 जीबी आणि 256 जीबी टॉप मॉडेल 55,999 रुपयांना उपलब्ध आहे. कंपनीने एसबीआय, एचडीएफसी आणि इतर बँक कार्डवर दहा टक्के कॅशबॅकची ऑफरही दिली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 9 जुलैपासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
दोन्ही फोन अँड्रॉइड 16 आधारित कलरओएस 16 वर चालतात आणि ड्युअल सिम सपोर्ट देतात. रेनो 16 मध्ये 6.32 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले असून 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. यात स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 प्रोसेसर, एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. रेनो 16सी मध्ये 6.57 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 चिपसेट आणि एलपीडीडीआर4एक्स रॅम देण्यात आली आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत रेनो 16 मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी, 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 50 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तर रेनो 16सी मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरीसह 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा मिळतो. दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबाबत रेनो 16 मध्ये 6700 एमएएच बॅटरी तर रेनो 16सी मध्ये सुमारे 7700 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे आणि दोन्ही 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. आयपी66, आयपी68, आयपी69 आणि आयपी69के रेटिंगमुळे हे फोन धूळ आणि पाण्यापासून अधिक सुरक्षित ठरतात. नवीन ओप्पो रेनो 16 मालिका दमदार फीचर्समुळे मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

