Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

वी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.. मेलबर्नमध्ये आयोजित होणाऱ्या पंतप्रधानांच्या भव्य कम्युनिटी प्रोग्रामपूर्वी सोशल मीडियावर त्यांना जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे.

या गंभीर प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी या धमकीबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नसून कोणत्याही अटकेची पुष्टी केलेली नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस, राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकांसह अनेक संस्थांच्या सहकार्याचा समावेश असेल.

ऑस्ट्रेलियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलबर्नच्या प्रसिद्ध मार्व्हल स्टेडियममध्ये 'मेलबर्न मीट्स मोदी' या भव्य भारतीय समुदाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी फेसबुकवर करण्यात आलेल्या एका पोस्टच्या खाली ही धमकी देण्यात आली. 'अबू मुस्तफा' नावाच्या एका संशयास्पद फेसबुक अकाऊंटवरून कमेंट करण्यात आली आहे की, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छप्पर बंद राहिलेलेच बरे पडेल, अन्यथा मोदी ऑस्ट्रेलियात आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासाठी येत आहेत. ही धमकी समोर येताच कार्यक्रमाच्या आयोजकांनी आणि भारतीय दूतावासाने तातडीने हे प्रकरण ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडे सोपवले.

धमकीचे गांभीर्य ओळखून ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणांनी तातडीने सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात या सोशल मीडिया पोस्टशी संबंधित IP Address ट्रॅक करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. ही कमेंट नेमकी कुठून आणि कोणी केली, तसेच यामागे कोणत्या दहशतवादी किंवा गुन्हेगारी संघटनेचा हात आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या गुन्हेगारी कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi