Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पालघर जिल्ह्यामध्ये १३,0९४ शेतकऱ्यांना कर्जमाफी

पालघर, 08 जुलै (हिं.स.) : नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पालघर जिल्ह्यातील १३,०९४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र कर्ज खात्यांची तपासणी पूर्ण करून त्यांची माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जालाही या योजनेचा लाभ लागू होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त होताच त्या सेवा संस्था, ग्रामपंचायत, बँक शाखा, सहायक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी 'आपले सरकार' सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi