Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा 'नो व्हेईकल डे'ला प्रतिसाद

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा 'नो व्हेईकल डे'ला प्रतिसाद

रभणी, 31 मे (हिं.स.) परभणी येथे संबोधी अकादमी, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी 'नो व्हेईकल डे'चे तंतोतंत पालन करत इलेक्ट्रिक वाहनातून कार्यक्रमस्थळी आगमन केले.

विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत नेहमीप्रमाणे पोलिस एस्कॉर्ट व्हॅनही नव्हती. पालकमंत्र्यांच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली.पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि शाश्वत वाहतुकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. वाढते प्रदूषण आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केले.पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या या साधेपणाचा आणि पर्यावरणाबाबतच्या संवेदनशीलतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचत असून, 'नो व्हेईकल डे'सारख्या उपक्रमांना अधिक बळ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi