Dailyhunt
पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू - पुणे महापौर

पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू - पुणे महापौर

पुणे, 04 एप्रिल (हिं.स.)। पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ महिलेचा बळी गेला. त्यामुळे महापालिकेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र समोर आले.

त्यानंतर आज पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य विभागांची तातडीची बैठक घेण्यात आली. कामात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत.

पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू केली जाणार आहेत. धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यासाठी ४८ तासांच्या आत परवानगी द्या, प्रशासनाने स्वतःहूनही यात पुढाकार घ्यावा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, महापौरांनी दिरंगाईबाबत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, कर्वेनगर, कोंढवा, कात्रज, पेठांसह सर्वच भागातील नाले तुडुंब भरले, रस्ते पाण्याखाली बुडाले, अनेक ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi