Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

परभणी - भाजप महानगर उपाध्यक्ष पदाचा रितेश झांबड यांचा राजीनामा

परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टीचे महानगर उपाध्यक्ष तथा परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक रितेश कांतीलालजी झांबड (जैन) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी भाजप महानगराध्यक्षांकडे अधिकृतपणे राजीनामा सादर केला.

आपल्या राजीनामा पत्रात रितेश झांबड यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालस्वयंसेवक असून मागील अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे नमूद केले आहे. वैयक्तिक कारणास्तव महानगर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपण कायम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देश, धर्म आणि माँ भारतीच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. आपल्या जागी नव्या आणि उमद्या कार्यकर्त्याला संधी देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, नागरिकांनी दिलेल्या १० वर्षांच्या नगरसेवक पदाच्या संधीचे ऋण फेडण्यासाठी अधिक वेळ जनसेवेसाठी देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून भाजप संघटनेत याकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi