Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
परभणी - लोहगावातील ऑटोमोबाईल्स व संत हरी इलेक्ट्रिकल दुकानाला आग; अनर्थ टळला

परभणी - लोहगावातील ऑटोमोबाईल्स व संत हरी इलेक्ट्रिकल दुकानाला आग; अनर्थ टळला

रभणी, 30 एप्रिल, (हिं.स.)। तालुक्यातील लोहगाव तसेच शहरातील जुना पेडगाव रोड-दर्गा परिसरात दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला.

पहिली घटना लोहगाव येथे घडली. येथील राजाभाऊ गणपतराव यांच्या अण्णा ऑटोमोबाईल्स व संत हरी इलेक्ट्रिकल या दुकानांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. दुसरी घटना जुना पेडगाव रोड-दर्गा परिसरातील एका बंद घरात घडली. येथे लागलेली आगही वेळेत नियंत्रणात आणण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे.

या दोन्ही ठिकाणी आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलातील कर्मचारी इनायत अली (वाहन चालक), सय्यद नजीम, डी.यू. राठोड, दीपक कानोडे, रोहित गायकवाड, निखिल बेडसुरे (फायरमन), तसेच वसीम अखिल अहमद व शेख सरवर (वाहन चालक) यांनी तत्परतेने कार्य करत आग आटोक्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi