Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

परभणी - शासकीय निवासस्थानावरील अतिक्रमण हटवून जागा प्रशासनाच्या ताब्यात; गुन्हा दाखल

रभणी, 31 मे (हिं.स.)गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानावरील अतिक्रमण हटवून सदर जागा प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आली असून, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महातपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत महादेव मंदिराजवळ उपकेंद्र आरोग्य साहाय्यिकेचे १५३.१० चौ.मी. क्षेत्रफळाचे शासकीय निवासस्थान आहे. संबंधित पद रद्द झाल्याने हे निवासस्थान रिक्त होते. या रिक्त शासकीय जागेवर अनधिकृतपणे ताबा घेण्यात आल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती.सदर जागा रिक्त करण्यासाठी संबंधितास सन २००३ पासून वेळोवेळी एकूण पाच कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तथापि, नोटिसांचे पालन न झाल्याने महसूल विभाग, पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या समन्वयाने तसेच पोलीस बंदोबस्तात दि. ३० मे २०२६ रोजी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शासकीय जागेचा ताबा जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आला.तपासादरम्यान संबंधित व्यक्तीने दि. १७ डिसेंबर २०२० ते ३० मे २०२६ या कालावधीत कोणताही कायदेशीर अधिकार नसताना शासकीय निवासस्थानाची इमारत पाडल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे शासनाच्या मालमत्तेचे अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र, महातपुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ अंतर्गत सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रावसाहेब गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi