परभणी, 06 मे (हिं.स.)। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम 2025-26 च्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते, पाणी व वीज उपलब्ध होण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
शेती उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे.
तसेच मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावागावातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज व सुरक्षित पोहोचण्यासाठी दर्जेदार रस्ते निर्माण करणे ही काळाची गरज आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार श्री हांडेश्वर, जिल्हा परिषद सदस्य मदनराव भोसले - विटेकर, बाळासाहेब कोल्हे, दत्तराव जाधव, सभापती पप्पू भैय्या घाडगे, मा. सभापती अनिलराव नखाते, उपसभापती श्याम धर्मे, कृषी अधिकारी सोनपेठ प्रियांका कावरे, गणेश कोरेवाड, श्री कोल्हे, संजय काका रणेर, राजेश ढगे, अविराज टाकळकर, संतोष कोल्हे यांच्यासह सर्व पदाधिकारी युवक सहकारी, तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी तसेच संबंधित विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

