Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पाथरीत अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई टिप्परसह दुचाकी जप्त

रभणी, 30 मे (हिं.स.)। जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पाथरी येथे अवैध रेती वाहतूक करणार्या टोळीवर कारवाई करत टिप्पर, दोन दुचाकी आणि रेती असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक क्रमांक 2 हे पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपेगाव रोड परिसरात पांढर्या रंगाचा हेड व लाल रंगाचा डाला असलेला टिप्पर (क्र. एमएच 12 एचडी 1272) संशयास्पद स्थितीत आढळून आला. वाहन थांबवून चौकशी केली असता टिप्परमध्ये रेतीची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी रेती वाहतुकीसंदर्भातील अधिकृत रॉयल्टी-टीपी परवान्याची मागणी केली असता चालकाने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर रेती अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक गजानन प्रल्हादराव पांचाळ (रा. खेर्डा, ता. पाथरी), वाहन मालक चंद्रसिंग एकनाथ नाईक (रा. माळीवाडा, ता. पाथरी) तसेच पोलिसांचे लोकेशन देणारा ओम बापुराव नाईक (रा. मरडसगाव, ता. पाथरी) यांना ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान एमएच 12 एचडी 1272 क्रमांकाचा टिप्पर, एमएच 22 बीएच 5569 क्रमांकाची यामाहा दुचाकी, एमएच 22 बीके 8619 क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी आणि 02 ब्रास रेती असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोउपनि भिसे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अर्जुन टरके, शेख ईरशाद, वाघमारे, चुडावकर आणि वाव्हळे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi