Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पेणमध्ये ४.८० लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

पेणमध्ये ४.८० लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

Hindusthan Samachar 0 months ago

रायगड, 30 मे (हिं.स.)। पेण तालुक्यातील आमटेम पाचआंबेवाडी येथे घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्याने तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. आमटेम पाचआंबेवाडी येथील महिला फिर्यादी घराबाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरात शिरल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटाचे ड्रॉवर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

घटनेची माहिती मिळताच वडखळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi