Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

फिटिंग करताना विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

ळगाव, 04 जुलै (हिं.स.) जोशीपेठ परिसरात एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना, विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा.

मासूमवाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जोशीपेठेतील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. मुस्तकीम आपल्या सहकाऱ्यांसह वायरिंगचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला.घटना लक्षात येताच सहकाऱ्यांनी तातडीने त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. मुस्तकीम गेल्या सुमारे २० दिवसांपासून एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत होता. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi