Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपरी-चिंचवडमध्ये १ ते ५ ऑगस्ट दरम्यान अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व

पिंपरी-चिंचवडमध्ये १ ते ५ ऑगस्ट दरम्यान अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व

पुणे, 02 जुलै (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात करण्यात येणार आहे.

महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२.३० वाजता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही समन्वय बैठक झाली

या बैठकीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, महापालिकेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ट्रस्ट, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, पोलिस प्रशासन तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विचार प्रबोधन पर्वाचे यशस्वी आयोजन, कार्यक्रमांचे नियोजन, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि विविध विभागांतील समन्वय याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली

अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वात दरवर्षी शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदाही विविध प्रबोधनपर, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी सर्व संबंधितांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi