Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पिनराई विजयन यांच्यावरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात माकपची निदर्शने

बीड, 30 मे (हिं.स.) : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी झालेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध करत बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी माकपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

माकपने या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयांनी वारंवार स्पष्ट केले आहे की पिनराई विजयन यांचा एक्सालॉजिक प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्याविरोधातील राजकीय छळ मोहीम सुरू ठेवण्यात येत आहे.

पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केरळमधील नव्या काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या दिल्लीतील पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर लगेचच ही कारवाई झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ही कारवाई राजकीय हेतूने रचलेले नाट्य असल्याचा आरोपही माकपने केला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर आणि सिरसाळा येथे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.

या निदर्शनांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच केंद्रीय यंत्रणांचा राजकीय वापर थांबविण्याची मागणीही आंदोलकांनी केली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi