Monday, 26 Oct, 6.19 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
पोलंडमधील रस्त्याला हरिवंशराय बच्चन यांचे नाव; बिग बींनी मानले पोलंड सरकारचे आभार

मुंबई, २६ ऑक्टोबर, (हिं.स.) : पोलंडमधील एका रस्त्याचे नाव 'हरिवंशराय' ठेवले जाणार असल्याची माहिती बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

"प्रबिसि नगर कीजे सब काजा. हृदयं राखि कोसलपुर राजा.' ~ रामचरितमानस , सुंदर कांड. भावार्थ - अयोध्यापुरीचे राजा श्री रघुनाथजी यांना हृदयात ठेवून नगरात प्रवेश करा. तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील, असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले असून या सन्मानासाठी त्यांनी पोलंड सरकारचे आभार देखील मानले आहेत.अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंशराय बच्चन उत्तम कवी होते. त्यांच्या कविता भारतातच नव्हे तर युरोप अमेरिकेतही वाचल्या जातात. पोलंडमध्ये हरिवंशराय यांच्या नावाने अनेकदा काव्यसंमेलनही भरवण्यात आली आहेत.

हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top