Saturday, 06 Mar, 4.22 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
पुणे : बीजेएस व फोर्स मोटर्स यांच्या 'मिशन लसीकरणास' प्रारंभ

पुणे 6 मार्च (हिं.स) : भारतीय जैन संघटना (बीजेएस) व फोर्स मोटर्स गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रात कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य करीत आहे. शासनातर्फे पुणे शहरातील ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. पुणे महानगरपालिकेबरोबर करार करून या सर्व केंद्रांमध्ये बीजेएस व फोर्स मोटर्सचे कार्य सुरु होत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये स्वागत कक्ष उभारणे, तेथे स्वयंसेवकांच्या माध्यमाने साईट मॅनेजमेंट करणे, सर्वसामान्य जनतेला योग्य मार्गदर्शन करणे, नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे तपासणे, कोमॉर्बिड व्यक्तींना मार्गदर्शन करणे, मोठ्याप्रमाणावर होणाऱ्या गर्दीला सामोरे जाण्यापेक्षा विशिष्ट अंतराने लोकांना लस घेण्यासाठी बोलाविणे, जेणेकरून गर्दी टाळली जाऊ शकेल व वयोवृद्ध लोकांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. तसेच कोमॉर्बिड लोकांना गर्दीचा त्रास होणार नाही हे पाहणे अशा गोष्टी या अंतर्गत समाविष्ट होतात. पुण्यामध्ये वेगाने पसरणाऱ्या नवीन केसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी याद्वारे मदत होईल. त्याचप्रमाणे महानगर पालिकेच्या घंटागाड्यांद्वारे गाणी, विविध घोषवाक्य, जिंगल्स या माध्यमाने जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. राज्य व केंद्र शासनाने मंजूर केलेल्या आयईसी मटेरियलप्रमाणे लसीकरण केंद्रावर योग्य तो प्रचार व प्रसार करण्यात येईल.

लसीकरणानंतर लस घेतलेल्या नागरिकांचा StepOne टेक्नॉलॉजी सिस्टीमद्वारे नियोजित पद्धतीने पाठपुरावा करण्यात येईल. जेणेकरून लसीकरणामुळे सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचे आजार होत असतील तर ते समोर येईल. जर लसीकरणामुळे तसे आजार होत नसतील तर लोकांच्या मनातील लसीकरणाची भीती कमी होऊ शकेल. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मा. रुबल अगरवाल व महानगरपालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सर्व आरोग्य अधिकारी व शासकीय रुग्णालयातील अधिकारी यांच्याबरोबर झूम कॉल घेऊन या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली व सर्व अधिकाऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले. लवकरात लवकर पुणे शहरातील लसीकरण सुरुळीत करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे व बीजेएस आणि फोर्स मोटर्स हे कार्य करण्यासाठी कटीबद्ध आहे. सोबत फोटोग्राफ जोडले आहेत.

हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top