Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पुणे- एमएनजीएल कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची आयुक्तांबरोबर घरगुती पाईपलाईन जोडणीसंदर्भात बैठक

पुणे, 28 मे (हिं.स.) महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम एन जी एल) कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची आयुक्त डॉ.विजयसूर्यवंशी यांच्या समवेत घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात झाली.

त्या बैठकीत कंपनीने कुशल मनुष्यबळ प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून याबाबत महापालिकेने सहकार्य करण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी येथे उपरोक्तविषयांकित प्रकरणी एमएनजीएल यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळावा घेण्यात आला.यात संस्थेमधील प्लंबर या ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थ्यांशी समक्ष संपर्क साधून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य तथा विभागप्रमुखशशिकांत पाटील यांनी विषयास अनुसरून माहिती दिली व भविष्यातील करिअरच्या दृष्टीने सदरचे कामकाज महत्त्वाचे असलेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एमएनजीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक वासुदेव गुरसाळी यांनी विद्यार्थ्यांना कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच प्लंबर्स इच्छुक असतील तर एम. एन. जी. एल. कडून त्यांना २ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल, प्रशिक्षणानंतर त्यांना अनुभवी प्लंबर्सच्या मार्गदर्शनाखाली साईटवर प्रत्यक्ष काम शिकवले जाईल तसेच भविष्यात सी जी डी कंपन्यांमध्ये कुशल प्लंबर्सची मागणी झपाट्याने वाढणार आहे, त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi