Saturday, 23 Jan, 6.26 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
पुणे : हापूस आंब्याची पुण्यात एन्ट्री; 25 हजाराचा घसघशीत भाव

पुणे 23 जानेवारी (हिं.स) : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचे यंदाच्या मोसमातले आगमन झाले असून पेटीला 25 हजाराचा घसघशीत भाव घेत हापूसची पुण्यात एन्ट्री झाली आहे. यावेळी बाजार समितीच्या प्रशासकांच्या हस्ते पेटीचे पूजन करून लिलाव करण्यात आला.पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये 2021 मधील आंब्याची पहिल्या पेटी नामदेव रामचंद्र भोसले यांच्या गाळ्यावर दाखल झाली. यंदाच्या वर्षी कोरोना संकटाचा प्रभाव बाजारावर दिसतो आहे. मात्र, हापूस आगमनावर त्याचा परिणाम झालेला नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा यंदा 15 दिवस आधीच हापूस आंबा पुणेकर हापूसप्रेमींच्या सेवेसाठी हजर झाला आहे. शिवाय, हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला विक्रमी 25 हजार रूपये भाव मिळाला आहे.

हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top