Dailyhunt
पुणे जिल्हा परिषदेत सभापतीपदासाठी नावे निश्चित

पुणे जिल्हा परिषदेत सभापतीपदासाठी नावे निश्चित

पुणे, 02 एप्रिल, (हिं.स.) - जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी अखेर मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांतील सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, ऐनवेळी बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा पत्ता कट झाला आहे.

मावळच्या दीपाली हुलावळे, वेल्हेच्या अमोल नलावडे, इंदापूरच्या अंकिता पाटील आणि हवेलीच्या जितेंद्र बढेकर यांना सभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठवलेले बंद पाकिट उघडून ही नावे जाहीर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, गटनेते श्रीमंत ढोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जाहीर झालेल्या नावांवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi