Dailyhunt

पुणे : स्वीकृत सदस्यपदासाठी 18 मार्चला निवडणूक

पुणे 6 मार्च (हिं.स) : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या दोन स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी येत्या गुरूवारी (दि.18) नगरपरिषदेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून सुरेश दाभाडे आणि जनसेवा विकास समितीकडून रवींद्र आवारे या दोघांनी मागील आठवड्यात आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाधिका-यांकडे सादर केले आणि ते मंजूरही झाले आहेत. या दोन्ही रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडीसाठी बुधवारी (दि 17) सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येईल. तर गुरूवारी (दि.
18) दुपारी 2 वाजता निवडणूक प्रक्रिया होणार आहे.
हिंदुस्थान समाचार .
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi