Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रस्त्यावर निष्काळजीपणे उभा टेम्पो ठरला जीवघेणा; दोघांचा मृत्यू

रस्त्यावर निष्काळजीपणे उभा टेम्पो ठरला जीवघेणा; दोघांचा मृत्यू

रायगड, 31 मे (हिं.स.)। मुंबई-गोवा महामार्गावरील लोहारमाळ गाव हद्दीत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला क्रेटा कारची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारमाळ गाव हद्दीत बालाजी हॉटेलसमोर मुंबई-गोवा महामार्गावर आरोपीने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. एमएच-०४-एलवाय-१६३८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने उभा केला होता. तसेच वाहन उभे करताना कोणत्याही प्रकारचा इशारा किंवा सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आली नव्हती.

दरम्यान, क्रेटा कार (क्र. एमएच-०८-एएन-२४३९) या उभ्या टेम्पोवर आदळली. या भीषण अपघातात कार चालक आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले, तर चालकाची पत्नी आणि मुलगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०/२०२६ दाखल करण्यात आला असून राजस्थान राज्यातील उदयपूर जिल्ह्यातील सुलंबर तालुक्यातील बासी झुंझावत येथील टेम्पो चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५, १०६(१), १२५(अ) व १२५(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi