Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रत्नागिरी : हैदराबादच्या प्री-आरडी परेड शिबिरासाठी साईराज शिंदेची निवड

रत्नागिरी : हैदराबादच्या प्री-आरडी परेड शिबिरासाठी साईराज शिंदेची निवड

रत्नागिरी, 24 ऑक्टोबर, (हिं.स.) । येथील देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक साईराज गजानन शिंदे (द्वितीय वर्ष बीएसस्सी) याची पश्चिम क्षेत्र पूर्व प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी (प्री आरडी परेड) निवड झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाराष्ट्राच्या संघात साईराजची पश्चिम क्षेत्र पूर्व प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी अंतिम निवड झाली आहे. साईराज शिंदे पुढील अंतिम निवडीकरिता तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे जाणार आहे. हैदराबाद येथील अनुराग युनिव्हर्सिटी (वेंकटपूर, मेदचल-मल्कानगिरी जिल्हा) येथे हे १० दिवसांचे प्री-आरडी परेड निवड शिबिर १० ते १९ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. साईराजला प्राचार्य मधुरा पाटील, संस्थाचालक, प्राध्यापकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi