Dailyhunt

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पोलिसांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर

त्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पोलिसांना 'पोलीस महासंचालक पदक' महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले आहे.

पोलीस दलात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना दरवर्षी 'पोलीस महासंचालक पदक' देऊन गौरविण्यात येते.

यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे मानाचे पदक पटकावले असून, यामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाची मान उंचावली आहे.

या बहुमानामध्ये पोलीस निरीक्षकांपासून ते पोलीस शिपायांपर्यंतच्या विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक जाहीर झालेल्यांमध्ये रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड आणि संदेश चव्हाण यांचा समावेश आहे. नागरिक हक्क संरक्षण पथकातील मोरेश्वर मयेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गव्हाणे आणि महिला पोलीस शिपाई शीतल पिंजरे यांनादेखील हे मानाचे पदक जाहीर झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi