Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रत्नागिरी : कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने यांना उमेदवारी

रत्नागिरी : कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने यांना उमेदवारी

त्नागिरी, 30 मे, (हिं.स.) । कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार कालपर्यंत निश्चित नव्हता. मात्र मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेत बाळ माने यांच्या नावाला अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंख्येच्या आकडेवारीनुसार शिवसेनेकडे ३३४, भाजपकडे २६४ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६५ मतदार असल्याचे सांगितले जाते. मात्र महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला असून दोन्ही आघाड्यांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.

महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा तसेच अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या प्रक्रियेत बहुतांश मतदारांनी अनिकेत तटकरे यांच्या नावाला पसंती दर्शवल्याचे सांगितले जात आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला तिढा सोडवण्यासाठी महायुतीत महत्त्वाची तडजोड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यात येणार असून त्याबदल्यात खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi