रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील शाखेतून अज्ञात इसमाने ऑनलाइन पद्धतीने तब्बल ५ लाख ८६ हजार रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.
धीरज अर्जुन भानुशाली (रा. शांतिनगर, रत्नागिरी) यांचे या बँकेत बचत खाते आहे. २५ जुलै रोजी संध्याकाळी ६:३६ ते ७:३७ या अवघ्या एका तासाच्या कालावधीत अज्ञात भामट्याने या खात्यातून लावत ५ लाख ८६ हजार ९ रुपये परस्पर वळवून घेतले.
आपल्या मित्राची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, कर सल्लागार राजेश रमेश सोहनी यांनी ३१ जुलै रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी
