रत्नागिरी, 30 मे, (हिं.स.) । पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देण्यासाठी एक झाड आईच्या नावाने या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वाढत्या प्रदूषणाच्या आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या काळात वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या हेतूने विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले.
यावे्ळी वर्षा परशुराम ढेकणे, संदीप सुर्वे, नीलेश आखाडे, नितीन जाधव, मोहन पटवर्धन, विक्रम जैन, मनोज पाटणकर, सचिन गांधी, अनिल शिवलकर, राजन फाळके, शैलू बेर्डे, आशिष मोरे, मुन्ना ढेकणे, मधुरा ढेकणे, प्रीती शिंदे, मंदार भोळे, शंकर शिंदे, संदीप मांडवकर आणि राजेंद्र मयेकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

