परभणी, 30 मे, (हिं.स.)। संबोधी अकादमी, महाराष्ट्र यांच्या वतीने रविवार 31 मे रोजी परभणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात 100 पेक्षा अधिक जोडपी विवाहबध्द होणार आहेत.
हा मंगल परिणय विधी बुध्द गया येथील महाबोधी महाविहारचे प्रमुख पूज्य भदंत हर्षबोधी महाथेरो, भीम जन्मभूमी मेमोरियल सोसायटी महूचे अध्यक्ष पूज्य भदंत धम्मदिप महाथेरो, खुरगाव येथील बुध्द विहार प्रमुख पूज्य भदंत पय्याबोधी थेरो, यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
या सामुहिक विवाह सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतूल सावे, जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. सि.एल. थूल, खासदार रामराव वडकुते, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुलजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई विजयकुमार वाकळे, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर, माजी खासदार डॉ. फौजिया खान, माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, डॉ. सिध्दार्थ भालेराव, इंजि. कुणाल कांबळे, मिलींद सावंत, गणेश राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रशासन, पोलीस, शिक्षण, आरोग्य व विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये महासंचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे राहुल रंजन महिवाल (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर जी. श्रीकांत (भा.प्र.से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई डॉ. अनिलकुमार गायकवाड, सहपोलीस आयुक्त, नागपूर शहर नविनचंद्र रेड्डी (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलवाद विरोधी पथक, नागपूर संदीप पाटील (भा.पो.से.), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला दिलीप स्वामी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, परभणी संजयसिंह चव्हाण (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी नतिशा माथुर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली विवेक गायकवाड (भा.प्र.से.), कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी प्रा. डॉ. इंद्रमणी, जिल्हा पोलीस अधीक्षक, परभणी पंकज कुमावत (भा.पो.से.), अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर डॉ. शिवाजीराव सुक्रे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, नांदेड डॉ. रत्नदीप गायकवाड, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई इंजि. विलास कांबळे, आयुक्त, परभणी महानगरपालिका नितीन नार्वेकर, प्रादेशिक उपायुक्त, इतर मागास बहुजन कल्याण विभाग जलील शेख व विजय साळवे, सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, महू डॉ. राजेश वानखेडे, प्रसिद्ध उद्योजक, छत्रपती संभाजीनगर भरतसिंह राजपूत तसेच सेवानिवृत्त क्रीडा सहसंचालक, पुणे चंद्रकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यात आजपर्यंत 3500 पेक्षा अधिक जोडपी विवाहबध्द झालेले आहेत. या विवाह सोहळ्यात सहभागी होणार्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेतंर्गत 20 हजारचे अनुदान मिळणार आहे (वधू/वर यांचा प्रथम विवाह असावा). तसेच संबोधी अकादमी, महाराष्ट्रच्या वतीने वधू-वरांना शुभ्र वस्त्र, सर्वांना सुरुची भोजन, वाजंत्री आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. वधु-वर नोंदणीसाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण तर मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाचा पुरावा म्हणून टी.सी.,/ दहावीची सनद / जन्म प्रमाणपत्र यापैकी एक, चार पासपोर्ट फोटो, वधू किंवा वर यापैकी किमान एका जणाचे जातीचे प्रमाणपत्र, वधु-वराचे रहिवाशी प्रमाणपत्र नोंदणी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी अविनाश मालसमिंदर-7798544786, यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
