Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रायगड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

रायगड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

रायगड, 30 मे (हिं.स.)। लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कर्जत तालुक्यातील आषाणे येथील रहिवासी असून त्याने नोव्हेंबर २०२४ पासून पीडित अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असूनही आरोपीने खालापूर तालुक्यातील सोंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील परिसरात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

यानंतर वावर्ले येथील दिघे फार्महाऊस येथेही आरोपीने दोन ते तीन वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढे आरोपी पीडितेला आपल्या आषाणे येथील घरी घेऊन गेला. तेथेही लग्न न करता तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून पीडिता आठ महिन्यांची गरोदर राहिली. गरोदर अवस्थेतही आरोपीने तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, २६ मे २०२६ रोजी आरोपीने मला तू नको आहेस असे सांगत पीडितेला घराबाहेर काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नुकताच अटक केली आहे.

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०४/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ६५(१), ६४(२)(ह), ६४(२)(म) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4(2),5(जे)(2),5(एल)(6)प्रमाणे जुने कलम-(भारतीयदंड संहिता 376 (2),(ह),(म)प्रमाणे.) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/जुंदरे हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi