Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामदा येथील जि. प. शाळेत घृणास्पद प्रकार; वर्ग आणि कुलूपावर विष्ठा लावली

सामदा येथील जि. प. शाळेत घृणास्पद प्रकार; वर्ग आणि कुलूपावर विष्ठा लावली

मरावती, २७ ऑगस्ट (हिं.स.) : तालुक्यातील सामदा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत अज्ञात व्यक्तींनी वर्गात तसेच मुख्य दरवाजाच्या कुलूपावर विष्ठा लावल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला.

सोमवारी सकाळी शाळा उघडल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसविणे शक्य झाले नाही.

वर्ग आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या कुलूपावर विष्ठा लावण्यात आल्याने शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शिक्षकांनी नियमित वर्गाऐवजी शाळेच्या पटांगणात अध्यापन केले. दरम्यान, शाळा प्रशासनाने तातडीने स्वच्छता करून घेतली.

या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञातांनी हे कृत्य कोणत्या उद्देशाने केले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून, कृत्यामागील कारण आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. "चिमुकल्यांच्या शाळेत अशाप्रकारे विष्ठा लावून काय साध्य करायचे आहे, हा प्रश्न आहे. या घृणास्पद कृत्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi