Monday, 13 Jul, 4.05 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
समाजवादी पार्टी अहमदनगर शहर कार्यकारिणीची घोषणा

अहमदनगर, 13 जुलै (हिं.स.):- समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली,तर प्रदेश महासचिव जुल्फेकार आजमी यांच्या सहमतीने समाजवादी पार्टीची अहमदनगर शहर कार्यकारणी शहराध्यक्ष अजीम राजे यांनी नुकतीच जाहीर केली. समाजवादीच्या शहर उपाध्यक्षपदी मोहंमद हुसेन,सरफराज शेख,सचिव डॉ.फैजान इनामदार,महा सचिव फैजान शेख,कार्याध्यक्ष फरिद सय्यद,सरचिटणीस फिरोज पठाण,सह चिटणीस मोइज शेख,विभाग प्रमुखपदी शाहबाज शेख,उजैर पठाण, अरबाज खान,समीर खान,अकील खान,प्रसिध्दी प्रमुखपदी वसीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली.पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी शहरात लवकरच समाजवादी पार्टीची सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. नुतन पदाधिकारी सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक पदाधिकारी हा सामाजिक भावनेने कार्य करणार असल्याची भावना शहराध्यक्ष अजीम राजे यांनी व्यक्त केली. नुतन पदाधिकार्‍यांचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हिंदुस्थान समाचार
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top