Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

शासकीय आयटीआय परभणीत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

रभणी, 30 मे (हिं.स.)। परभणी येथील गोंधळ महर्षी राजारामबापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शैक्षणिक वर्ष 2026 साठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती प्राचार्य विकास आडे यांनी दिली.

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी प्रथम ऑनलाइन अर्ज भरून त्याची निश्रि्चती (कन्फर्मेशन) करणे तसेच ट्रेडचे विकल्प भरणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार पार पडणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचनांचा अभ्यास करून अर्ज करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली असून अर्ज निश्चितीची प्रक्रियाही त्याच दिवसापासून सुरू आहे. तर ट्रेड विकल्प भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी शासकीय आयटीआयमध्ये विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आयटीआयमध्ये भेट देऊन आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विविध ट्रेडमध्ये प्रवेश उपलब्ध...

संस्थेत लाकूड काम तंत्रज्ञ, कॉस्मेटॉलॉजी, मेकॅनिक, ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, प्लास्टिक प्रोसेसिंग, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, शिवण तंत्रज्ञान, वेल्डर, ड्राफ्ट्समन सिव्हिल, वीजतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, यंत्र कारागीर, मोटार वाहन मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एसी मेकॅनिक, सर्वेअर, टर्नर, पेंटर जनरल, तारतंत्री, आरेख यांत्रिकी आदी विविध ट्रेडमध्ये प्रवेश उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

प्रवेश प्रक्रियेसाठी विविध समित्यांची स्थापना...

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्राचार्य विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रवेश समिती प्रमुख म्हणून गोपाळ घायाळ, उपप्रमुख म्हणून मधुकर ब्राह्मणे व संदिपान वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली असून तक्रार निवारण समिती, प्रवेश मार्गदर्शन समिती, प्रचार-प्रसार समिती, अर्ज तपासणी समिती, ऑनलाइन निश्रि्चती समिती, साहित्य पुरवठा समिती, सुरक्षा समिती व विद्युत समिती आदी समित्याही गठित करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने ऑनलाइन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवेश समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi