Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार दूध

शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार दूध

'पराग' आणि 'वारणा'कडे पुरवठ्याची जबाबदारी

मरावती, 01 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यभरातील शासकीय वसतिगृहे आणि शासकीय निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

या विद्यार्थ्यांना नियमित दूधपुरवठा करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समितीने अखेर 'पराग मिल्क फूड' आणि 'श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड' यांची निवड केली आहे. या दोन्ही पुरवठादारांना प्रत्येकी ५० टक्के दूधपुरवठ्याचे कंत्राट देण्यास मंजुरी देण्यात आली असून, समाजकल्याण आयुक्तांना तात्काळ पुरवठा करण्याचे निर्देश ३१ ऑगस्ट रोजी शासनादेशाद्वारे जारी करण्यात आले आहेत.

प्रयेक विद्यार्थ्यांना मिळणारे दूध दर्जेदार आणि सुरक्षित असावे, यासाठी २०० मि.ली.च्या टेट्रा पॅकमध्ये हा दूधपुरवठा केला जाणार आहे. खरेदी समितीने यासाठी प्रति टेट्रा पॅक २६.४० रुपये असा दर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, हा मंजूर दर पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून, या ३ वर्षांत पुरवठादारांना कोणत्याही प्रकारची दरवाढ दिली जाणार नाही, अशी अट शासनाने घातली आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी स्पष्ट केले आहे.

२०० मि.ली. टेट्रा पॅकसाठी २६.४० रुपये

विद्यार्थ्यांना मिळणारे दूध दर्जेदार आणि सुरक्षित असावे, यासाठी २०० मि.ली.च्या टेट्रा पॅकमध्ये हा दूधपुरवठा केला जाणार आहे. खरेदी समितीने यासाठी प्रति टेट्रा पॅक २६.४० रुपये असा दर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, हा मंजूर दर पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून, या ३ वर्षांत पुरवठादारांना कोणत्याही प्रकारची दरवाढ दिली जाणार नाही, अशी अट शासनाने घातली आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi