Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जळगावातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

Hindusthan Samachar 3 months ago

जळगाव, 02 जुलै (हिं.स.) शासनाच्या 2 जून,2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणींतर्गत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 63 हजार 511 कर्जखात्यांची, एकूण 332.27 कोटी रुपयांच्या कर्जरकमेची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या दि. 6 जुलै 2026 नंतर तालुकास्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे.

दरम्यान, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दिनांक 11 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती गठित करण्यास मान्यता दिली आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेत समितीतील सर्व सदस्यांना शासन निर्णयातील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi