यवतमाळ 30 जुलै (हिं.स.)
तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्!यांनी पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. हवामान विभागाकडून आणि विविध माध्यमांतून २०२६-२७ मध्ये 'अल निनो'च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने अनेक शेतकर्!यांनी कापसाच्या पेरणीत कपात करत हळदीच्या लागवडीकडे मोठा कल दर्शविला आहे.
त्यातच उसाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने अनेक शेतकर्!यांनी ऊस लागवडही कमी करून हळद या नगदी पिकाची निवड केली आहे.
यंदा सुरवातीलाच पावसाने पाठ फिरविल्यामुळे जून आणि जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात शेतकरी चिंतेत होते. पेरणी उशिरा झाल्याने आणि भविष्यातील पावसाबाबत अनिश्चितता असल्याने पीक निवडताना शेतकर्!यांनी सावध भूमिका घेतली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये तालुक्यात १४ हजार ७२८ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. मात्र २०२६ मध्ये ती घटून १२ हजार २३७ हेक्टरवर आली आहे. दुसरीकडे २०२५ मध्ये दोन हजार ५६० हेक्टरवर असलेली हळदीची लागवड यंदा लक्षणीय वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. सोयाबीन, ऊस आणि कापसापेक्षा अनेक शेतकरी हळद या पिकाला प्राधान्य देत आहेत. मात्र हळदीकडे वाढलेल्या कलासोबतच शेतकर्!यांच्या मनात नवीन चिंता निर्माण झाली आहे. हळद हे अधिक पाण्याची गरज असलेले पीक असल्याने आगामी दोन ते तीन महिन्यांत पुरेसा पाऊस पडेल का, याकडे शेतकर्!यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकर्!यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरीही अद्याप नदी-नाले दुथडी भरून वाहिले नसल्याने भूजल पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. ऊस उत्पादक शेतकर्!यांनीही कारखान्यांकडून ऊस बिलाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे यंदा उसाचा पेरा काही प्रमाणात कमी केल्याचे सांगितले. त्यामुळे ऊस क्षेत्रातील घट आणि हळदीच्या क्षेत्रातील वाढ हे यंदाच्या खरीप हंगामाचे ठळक वैशिष्ट ठरत आहे. सध्या तालुक्यातील पिकांची परिस्थिती समाधानकारक असून आवश्यक तेवढा पाऊस पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, अल निनोचा संभाव्य परिणाम आणि उर्वरित पावसाळ्याचे चित्र कसे राहते, यावरच खरीप हंगामाचे यश अवलंबून असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

