Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिद्धेश्वर मंदिर देवस्थान कमिटीकडून आ. बसवराज पाटील यांचा भव्य सत्कार

सिद्धेश्वर मंदिर देवस्थान कमिटीकडून आ. बसवराज पाटील यांचा भव्य सत्कार

लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांनी रविवारी सोलापूरचे आराध्य ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे जाऊन श्री सिद्धेश्वरांचे विधिवत दर्शन घेत महाआरती केली.

राज्याच्या प्रगतीसह जनतेच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली.

दर्शनानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी यांच्या वतीने आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांचा विधान परिषद निवडणुकीतील विजयानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी श्री सिद्धेश्वरांची मूर्ती, तीर्थप्रसाद आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. देवस्थानाच्या वतीने झालेल्या या सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना आमदार बसवराज पाटील मुरूमकर म्हणाले की, हा सन्मान माझा वैयक्तिक नसून जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा आहे. जनतेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देणार असून, भविष्यातही सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा माझा निर्धार कायम राहील.

यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सिद्रामप्पा बमणी, महादेव चाकोते, शरणय्या स्वामी, भीमाशंकर माळगे, दिलीप भालेराव, गुरुनाथ माळगे, प्रकाश आष्टे, प्रकाश बिराजदार, संग्राम पाटील, नितीन उपासे, शिवकुमार पाटील, बाळासाहेब भेगडे, रतन रिक्के, विश्वनाथ हब्बा, सुरेश म्हेत्रे, विलास कारभारी, पशुपती माशाळ, मल्लिनाथ मसरे आणि काशिनाथ दर्गो पाटील यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, भाविक आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरती, दर्शन आणि सत्कार सोहळ्यानंतर उपस्थितांनी आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi