Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

सीजेपीच्या भवितव्यावर छत्रपती संभाजीनगरात मंथन; दिल्लीतील प्रवक्ते बैठकीसाठी दाखल

त्रपती संभाजीनगर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील कॉक्रोच जनता पक्षाच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी पक्षाची बैठक बुधवारी शहरात सुरू झाली आहे. पक्षाध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीसाठी दिल्लीहून पक्षाचे प्रवक्ते आणि पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहेत.

पक्षाची आगामी भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि पुढील राजकीय दिशा यावर सविस्तर चर्चा सुरू असून बैठकीतील निर्णयांकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi