सोलापूर 6 मार्च (हिं.स) : जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जात आहेत. या गोळ्यांचे वाटप आशा, अंगणवाडीसेविका यांच्याकडून कोविडची योग्य ती खबरदारी घेऊन घरी जाऊन वाटप केले जात आहे. आठवड्याभरात ८ लाख ६० हजार मुला-मुलींना गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली.
१ ते ५ वयोगटातील मुलांना ही गोळी अंगणवाडीतून दिली जात आहे. तर ६ ते १९ वयोगटातील मुलांना शाळेतून दिली जात आहे. शाळा बंद असल्यामुळे आराेग्य कर्मचारी घरोघरी जाऊन गोळ्या देत आहेत. ही गोळी पूर्णत: सुरक्षित आहे. ही जंतनाशक गोळी गोळी चावून खायची आहे.
हिंदुस्थान समाचार
